
International Study on Covid Long Term Vascular Effects: कोरोनाच्या जागतिक साथीला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या विषाणूच्या दुष्परिणामांवर अजूनही संशोधन सुरू आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांचे वय वाढून त्या पाच वर्षांनी वृद्ध होऊ शकतात, असा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संशोधनात काढला आहे. विशेषत: महिलांना अधिक धोका असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.