cow goat milk good guidance White flakes in hair

cow goat milk good guidance White flakes in hair

sakal

तर काय?

आयुर्वेदामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व गाईच्या दुधाला दिलेले आहे. गाईचे दूध मिळत नसल्यास शेळीचे किंवा म्हशीचे दूध वापरावे, असे सांगितलेले आहे.
Published on

मला मध्यंतरी एका मित्राने सांगितले की गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दूध वापरणे जास्ती चांगले. हे खरे आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.

- श्री सातपुते, मालाड

उत्तर – आयुर्वेदामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व गाईच्या दुधाला दिलेले आहे. गाईचे दूध मिळत नसल्यास शेळीचे किंवा म्हशीचे दूध वापरावे, असे सांगितलेले आहे. शेळीचे दूध पचायला अत्यंत हलके, तसेच श्‍वसनसंस्थेला मदत करणारे असते. त्यामुळे अपचन, जुलाब, सर्दी, खोकला, छातीत जडपणा वाटणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे वगैरे आजारांमध्ये शेळीचे दूध अत्यंत उत्तम असते. आपल्याकडे गावागावांमध्ये शेळीचे दूध मिळते, त्याचे घरी पनीरही बनवता येते. बाहेरच्या देशांमध्ये शेळीच्या दुधापासून बनवलेले चीज अत्यंत लोकप्रिय असते. गाईचे नैसर्गिक दूध सगळ्यांत उत्तम असते, त्याच्या खालोखाल शेळीचे दूध अनेक गुणांनी परिपूर्ण असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com