Cucumber Benefits : काकडी सालीसकट खावी किंवा साल काढून? जाणून घ्या योग्य पद्धत

काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. डिहायड्रेशनच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काकडी फार फायदेशी आहे
Cucumber Benefits
Cucumber Benefitsesakal

Cucumber Benefits : बरेचजण कच्ची काकडी सॅलेड म्हणून खातात. तर काहींना काकडीचे वेगवेगळे पदार्थ करून खायला आवडतं. काकडी ही पोषक तत्वांनी युक्त असते त्यामुळे उन्हाळ्यात काकडीला इतर सीजनच्या तुलनेत जास्त मागणी असते.

काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. डिहायड्रेशनच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काकडी फार फायदेशी आहे. मात्र काही लोक काकडीची साल काढून खातात तर काही लोक सालीसकट काकडी खातात. तेव्हा काकडी खाण्याची योग्य पद्धत काय ते आपण जाणून घेऊया.

काकडी सालीसकट खावी की साल काढून?

तुम्ही काकडी सालीसकट खाल तर त्याचे जास्त फायदे तुम्हाला मिळतील. कारण काकडीच्या सालीत अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला त्याचे बरेच फायदे मिळतात. काकडीच्या सालीत टॅनिन आणि फ्लेलोनॉइ़डसह एकापेक्षा एक भारी अँटिऑक्सिडंट्स असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचा बचाव करतात. चला तर सालीसकट काकडी खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

काकडी सालीसकट का खावी?

1) वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते - जेव्हा तुम्ही काकडी सालीसकट खाता तेव्हा वजन कमी करण्यास ती मोठ्याप्रमाणात फायदेशीर ठरते. काकडीची सालं बॉडी डिटॉक्स करण्याससुद्धा फायदेशीर आहे.

2) कफच्या समस्येसाठीही फायदेशीर - तुम्ही सालीसकट काकडी खात असाल तर तुम्हाला कफच्या समस्या होणार नाहीत. काकडी सालीसकट खाल्ल्याने पोट साफ होतं आणि शरीर हायड्रेट राहातं. शिवाय पोटाशी निगडीत समस्याही दूर होतात.

Cucumber Benefits
तुम्ही देखील Cucumber सोलून खाताय? मग आजच बदला सवय, नाहीतर होईल मोठं नुकसान

3) बॉडी डिटॉक्स करण्यासही फायदेशीर - काकडी सासीसकट खाल्ल्याने बॉडी डिटॉक्स करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. काकडीची साल टॉक्सिन्स शरीराबाहेर काढण्यास फायदेशीर आहे. (Health)

काकडी खाताना अशी घ्या काळजी

काकडी खाण्याआधी तिला अगदी स्वच्छ धुवून घ्या.

जमल्यास काकडी धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा.

काकडीचा वरचा आणि खालचा सुरुवातीचा भाग आधी कापून नंतर त्याचे काप करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com