तुम्ही देखील Cucumber सोलून खाताय? मग आजच बदला सवय, नाहीतर होईल मोठं नुकसान

अनेकजण काकडी न सोलता खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं म्हणत ती सालीसह खाणं पसंत करतात. त्यामुळे नक्की काकडी कशी खावी असा प्रश्न अनेकांना कायम पडतो
काकडी सोलून खाण्याचे परिणाम
काकडी सोलून खाण्याचे परिणामEsakal

उन्हाळा सुरु झाला की आपल्या आहारात काकडीचा हमखास समावेश केला जातो. जेवणासोबतच नव्हे तर दिवसभरात कधीही गारेगार काकडी खाणं अनेकजण पसंत करतात. काकडीचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. यात अनेक पोषक तत्व आढळून येतात. काकडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम तसचं आयर्न मोठ्या प्रमाणात आढळून येत. Healthy Food Habits in Marathi Benifit of Cucumber how to eat cucumbers as a snack

तसचं शरिरासाठी आवश्यक असणारे मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडनट काकडीमधून Cucumber मिळतात. त्याचसोबत यात पाण्याचं Water भरपूर प्रमाण असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. त्वचा, केस तसचं वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेही रुग्णांसाठी Diabetic Patients Pकाकडीचे अनेक फायदे आहेत.

मात्र काकडी खाताना अनेकांना ती कशी खावी याबद्दल प्रश्न निर्माण होतो.  काकडी ही सोलून म्हणजेच तिची साल काढून खाल्ली तर चवीला चांगली लागते. कोशिंबीर किंवा सलाडमध्येही सोललेल्या काकडीचे तुकडे अधिक चविष्ट लागतात. तर अनेकजण काकडी न सोलता खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं म्हणत ती सालीसह खाणं पसंत करतात. त्यामुळे नक्की काकडी कशी खावी असा प्रश्न अनेकांना कायम पडतो.

वेबमेडच्या एका वृत्तानुसार काकडी न सोलता खाल्ल्याने त्याचे आरोग्याला अधिक फायदे मिळतात. यामुळे काकडीत असलेलं विटामिन के, विटामिन सी यांसह अनेक मिनरल्स आणि विटामिन्स शरीराला मिळतात. मात्र जर आपण काकडीची साल काढून टाकली तर तीची सर्व गुणधर्मांचा लाभ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे काकडी न सोलता खाणं योग्य. मात्र सेंद्रीय आणि स्वच्छ काकडीच न सोलता खावी.

हे देखिल वाचा-

काकडी सोलून खाण्याचे परिणाम
Side Effects of Excess Water : उन्हाळा आहे म्हणून जास्त पाणी पिणे धोकादायक, असू शकतो हा गंभीर आजार?

काकडी खाण्याची योग्य पद्धत़

अलिकडे चांगल उत्पादन मिळावं यासाठी पिकांवर अनेक फवारण्या केल्या जातात. तसंच काकडी स्टोअर करतानाही त्याच्यावर सिंथेटिक वॅक्स लावलं जातं. त्यामुळे काकडी खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवावी. शक्य झाल्यास कोमट पाण्याने काकडी स्वच्छ धुवावी आणि कोरड्या कापडाने ती कोरडी करावी. यामुळे त्यावरी वॅक्स निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतरच काकडी सालासकट खावी. काकडीचं साल कडू असेल. तर अशा काकडीचं सेवन करू नये.

काकडीच्या सालीतही अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात. ज्याचा आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायदा होत असतो. पाहुयात काकडीच्या सालीचे काही फायदे. 

बद्धकोष्ठतेचा त्रास दूर- काकडीच्या सालीमध्ये अधुलनशील फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास उपायकारक ठरतं. ज्या लोकांना मल कठीण होण्याची समस्या असते. त्यांना काकडीच्या सालीचा फायदा होतो. 

भूक कमी करण्यास मदत- वजन कमी करण्यासाठी सतत होणाऱ्या खाण्याच्या इच्छेवर ताबा मिळवणं गरजेचं असतं. सालीसह काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. सालीसकट काकडी खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. त्यामुळे वेळोवेळी खाण्याची इच्छा कमी होते. तसंच यामुळे मेटाबोलिज्म जलद होवून वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वेट लॉस डाएटमध्ये काकडीचा सालीसह समावेश करावा.

त्वचेसाठी फायदेशीर- काकडीच्या सालामध्ये एस्कॉर्बिक ऍसिड (Ascorbic acid) उपलब्ध असतं. हे ऍसिड त्वचेसाठी गुणकारी आहे. यामुळे त्वचेचं होणारं नुकसान कमी होवून त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. यामुळे कोलेजन जलद गतीने तयार होण्यात मदत होत असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.परिणामी तुम्ही तरुण दिसता. 

डोळ्यांसाठी फायदेशीर- सालीसह काकडीचं सेवन केल्याने डोळे निरोगी राहण्यास मदत होते. काकडीची साल हे विटामिन ए म्हणजेच बीटा-कॅरेटीनचा एक उत्तम स्रोत आहे. यामुळे तुमची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. यातील बीटा- कॅरेटीनमुळे तुम्हाला डोळ्यांशी संबधीत आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

हे देखिल वाचा-

काकडी सोलून खाण्याचे परिणाम
Cucumber Salad : धक्कादायक! काकडीमध्ये सलादचे घटक सर्वाधिक कमी, एक्सपर्टचा दावा

हृदयासाठी फायदेशीर- काकडीतील सालीमध्ये उपलब्ध असणाऱ्या विटामीन K मुळे ब्लड क्लॉटिंग  रोखण्यास मदक करतं. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे विटामिन के मुळे हाडं मजबुत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मेंदूचं कार्य सुरळीत चालण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. 

त्यामुळे आहारात काकडीचा समावेश करताना ती सालासह असेल याकडे लक्ष द्या आणि आरोग्यासाठी फायदे मिळवा. काकडीचं सेवन करताना मात्र ते योग्य वेळी करा अन्यथा काही आरोग्याच्या समस्या निर्माण होवू शकतात. रात्रीच्या वेळी काकडीचं सेवन टाळाव. दिवसभरात कधीही तुम्ही काकडी खाणं आरोग्यासाठी लाभदायक असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com