Cholesterol Issue : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्या हे चमत्कारी पाणी, त्रास झटक्यात कमी होईल

कढी पत्त्याचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Cholesterol Issue
Cholesterol Issueesakal

Cholesterol Issue : कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. ही पौष्टिकतेने युक्त पाने आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत. त्यात ए, बी, सी आणि ई इत्यादी अनेक जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय यामध्ये प्रथिने, फायबर लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी आवश्यक खनिजे देखील असत

कडी पत्ता अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी देखील समृद्ध आहेत. शरीराचे वजन कमी करण्यापासून ते मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यापर्यंत कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. उच्च कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठीही हा रामबाण उपाय ठरू शकतो.

कारण याचे सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. पण कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन कसे करावे याबद्दल लोक खूप गोंधळलेले असतात. लोक सहसा कढीपत्ता थेट चघळतात, किंवा भाजी बनवताना वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीऐवजी तुम्ही कढीपत्त्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मोठी मदत होते. मात्र कडी पत्त्याचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कडी पत्त्याचा असा वापर करा

हे पाणी बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त चहाच्या पातेल्यात २०० मिली पाणी उकळावे लागेल आणि त्यात ८-१० कढीपत्त्याची पानं घालावी लागेल. पाणी थोडे कमी झाले की गॅस बंद करा. हे पाणी गाळून एका भांड्यात काढा. आता ते थेट सेवन केले जाऊ शकते. किंवा त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून चहाप्रमाणे पिऊ शकता. कारण अशा प्रकारे सेवन केल्याने आरोग्यासाठी जबरदस्त फायदे मिळू शकतात.

Cholesterol Issue
Curry Leaves For Hair : केसांवर सतत केमिकल लावण्यापेक्षा एकदा कडिपत्त्याचा मास्क लावून बघाच!

हाय कोलेस्ट्रॉल असल्यास कडी पत्त्याच्या पानाचे हे फायदे होतील

कढीपत्ता अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. जेव्हा तुम्ही कढीपत्त्याचे पाणी पिता तेव्हा ते शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स पेय म्हणून काम करते. याचे सेवन केल्याने फ्री-रॅडिकल्सशी लढण्यास, हानिकारक बॅक्टेरिया आणि घाण काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल हळूहळू वितळू लागते. यामुळे शरीराचे वजन आणि चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांच्या अनेक समस्या दूर करू शकतात.

Cholesterol Issue
High Cholesterol Foods : High Cholesterol संपवून रक्तवाहिन्यांना चकचकीत करतात ही 3 धान्य !

डिस्क्लेमर - कडी पत्त्याचे सेवन निरोगी आरोग्यासाठी महत्वपूर्ण असले तरी त्याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com