
Curry Leaves Home Remedies: कोणतीही गृहिणी भाजीवाल्याकडे गेल्यानंतर कढीपत्ता न घेता परत येत नाही. मुर्नेया कोएनिगी हे कढीपत्त्याचे शास्त्रीय नाव. या कढीपत्त्याची पाने तऱ्हेतऱ्हेच्या पदार्थांना स्वाद देतात आणि औषधातही अतिशय उपयुक्त असतात. कढीपत्ता हे अंगणात वा घराच्या बाल्कनीत कुंडीत वाढणारे झुडुप असून, अनेक स्त्रिया अशा ताज्या कढीपत्त्याचा वापर करणे पसंत करतात. हीच पाने वाळवून-भाजून त्याची पूडही तयार करून ठेवता येते. अख्खी पाने पदार्थांमध्ये न वापरता त्याची पेस्ट वा पाने बारीक चिरून घातल्यास या पानांचा पूर्णपणे आरोग्यदायी गुणधर्म शरीरास मिळू शकतो. ही कला स्त्रीच्या हातात असते व तिने ती स्वतःसाठी व कुटुंबासाठी वापरावी.