
Health Benefits of Eating Jaggery Daily
sakal
Surprising Health Benefits of Eating Jaggery Every Day: साखरेप्रमाणेच गूळदेखील ९८-९९ टक्के लोकांच्या किचनचा भाग असतो, हा काही पोटभरीचा पदार्थ नसला, तरी पोटभर चविष्ट जेवण्यासाठी पदार्थांना चविष्टपणा मात्र देतो. गूळ-तूप-पोळी हा मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा आवडीचा व सोपा पदार्थ. डाळी-उसळी, खिचडी-लाडू-वड्या असे पदार्थ गुळामुळे चविष्ट होतात. तिळगूळ व गूळपोळी ही तर मेजवानीच. चहा-पन्हे-सरबत यांतही गूळ वापरता येतो. अर्थात याचे आरोग्यदायी परिणाम मिळविण्यासाठी गूळ हा गडद तपकिरी रंगाचा घ्यावा. त्यावर कमीत कमी रसायने वापरलेली असतात. ही गुरुकिल्ली स्त्रियांच्या हातात असते.