दिल्लीत १५ वर्षांच्या मुलांमध्येही GI कॅन्सर! वायुप्रदूषण ठरतंय का छुपा धोका? वाचा डॉक्टर काय सांगतात

GI CANCER IN TEENAGERS IN DELHI: दिल्लीत १५ वर्षांच्या रुग्णांमध्येही पचनसंस्थेचा कॅन्सर आढळला. वायुप्रदूषण, PM2.5 आणि ओझोनचा कॅन्सरशी काय संबंध आहे? जाणून घ्या संशोधन काय सांगतं.
GI CANCER IN TEENAGERS

GI CANCER IN TEENAGERS

sakal

Updated on: 

AIR POLLUTION AND GASTROINTESTINAL CANCER RISK: कॅन्सर म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते वाढतं वय, पण आता किशोरवयीन मुलांमध्येही कॅन्सरची प्रकरणं समोर येत आहेत. दिल्लीतील एका रुग्णालयात अवघ्या १५ वर्षांच्या रुग्णांमध्ये पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सर आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वायुप्रदूषण आणि कॅन्सर यांच्यात काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संशोधनातून प्रदूषण आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र, तरुणांमधील कॅन्सरला वायुप्रदूषणच कारणीभूत आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com