DengiAll: डेंग्यूला घाबरण्याचे दिवस संपणार? भारताची पहिली स्वदेशी लस ‘DengiAll’ लवकरच येणार

INDIA'S FIRST INDIGENOUS DENGUE VACCINE: डेंग्यूविरोधात भारताची पहिली स्वदेशी ‘DengiAll’ लस चर्चेत असून, चाचण्या यशस्वी झाल्यास 2027 पर्यंत ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
DengiAll : India's First Dengue Vaccine

DengiAll : India's First Dengue Vaccine

sakal

Updated on

WHAT IS DENGIALL AND WHEN WILL IT BE AVAILABLE: दरवर्षी पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. ताप, अंगदुखी, प्लेटलेट्स कमी होणे अशा त्रासांमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागते. आता डेंग्यूविरोधातील लढाईत भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारताची पहिली स्वदेशी डेंग्यू लस ‘DengiAll’ लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ही लस ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पुढाकारातून विकसित केली जात आहे. लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि नियामक मान्यता मिळाली, तर 2027 पर्यंत ही लस सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com