Dengue mosquito : डेंगी वाहक डासांच्या अंड्यांचे गूूढ उकलले

चयापचय क्रिया बदलून विषाणंूचे रक्षण; आजार नियंत्रणाचा नवा मार्ग सापडणार
dengu
dengusakal

नवी दिल्ली - जगभरात डेंगी व चिकुनगुनियासारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठे आहे. या आजारांचे विषाणू वाहून नेणारी डासांची अंडी अतिनिर्जलीकरणाच्या अवस्थेतही चयापचयाच्या क्रियेत बदल करून तग धरू शकतात, असा निष्कर्ष एका संशोधनात काढण्यात आला आहे. बंगळूरमधील इन्स्टिट्यूट फॉर स्टेल सेल सायन्स, रिजनरेटिव्ह मेडिसीन व आयआयटी मंडीने संयुक्तरित्या हे संशोधन केले.

सजीवातील पेशी मुख्यत: पाण्यापासून बनतात. त्यामुळे, शुष्कीकरण ही कोणत्याही सजीवासाठी प्राणघातक गोष्ट ठरू शकते. अनेक प्रकारच्या सूक्ष्मजंतूंनी स्वत:चा शुष्क होण्यापासून बचाव करण्यासाठी तंत्र विकसित केले आहे. केवळ काही प्राण्यांमध्येच ते दिसते. त्यात डेंगी, झिका, चिकुनगुनियासारख्या आजारांचे विषाणू वाहून नेणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या प्रजातीचाही समावेश आहे. उत्तर आफ्रिकेत मूळ असणारी एडिस इजिप्ती या डासांची प्रजाती जगभर पसरली आहे.

ऊबदार, आर्द्र प्रदेशांत त्यांचा धोका मोठा आहे. या डासांना अळीच्या स्वरूपात अंड्यातून बाहेर येण्यासाठी ४८ ते ७२ तास लागतात. शुष्कीकरणात तग धरण्यासाठी त्यांचे आयुष्य किमान १५ तासांचे असणे आवश्यक आहे, असेही संशोधकांना आढळले. मात्र, त्यापूर्वीच शुष्क झालेल्या अंड्यांमधून पुनर्जलीकरण झाल्यानंतर डासांच्या अळ्या बाहेर पडू शकत नाहीत.

संशोधक सुनील लक्ष्मण म्हणाले, की जगभरात जवळपास निम्म्या लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या विषाणुजन्य आजारांना ‘एडिस इजिप्ती’ प्रजातीचे डास कारणीभूत आहेत.

dengu
Dengue : डेंगी संशयित महिलेचा मृत्यू; आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर

त्याचप्रमाणे, या डासांच्या विषाणूंच्या वेगवान भौगोलिक विस्तारामुळे एडिस इजिप्तींच्या अंड्यांचे अस्तित्व व त्यांचा जागतिक प्रसार कमी होण्यात मदत होते. काही विशिष्ट अवरोधक या डासांच्या अंड्यामधील निर्जलीकरण प्रतिरोधक क्षमता कमी करतात. त्याचप्रमाणे, इतर अवरोधक अंड्यांचे निर्जलीकरण होण्याच्या अन्य टप्प्यांवरही परिणाम करतात. ते डासांना नियंत्रित करणारे एजंट म्हणून उपयुक्त ठरू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

कसे केले संशोधन?

संशोधकांच्या पथकाने डासांच्या शुष्कीकरण झालेल्या व न झालेल्या अंड्यांमधील प्रोटिओम्सची (प्रथिनांचा संच)तुलना केली. यावेळी शुष्कीकरण झालेल्या अंड्यांमधील चयापचयाच्या प्रक्रियेत बदल झाल्याचे आढळले. विकरांच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे चयापचयाची गती वाढत असल्याचेही निदर्शनास आले. एकूणच या अंड्यांमधील चयापचयाची पातळी कमी झाली होती तर ग्लुटेमाईन आणि अमिनो ॲसिडची पातळी वाढली होती. त्याचप्रमाणे, शुष्कीकरणामुळे ऑक्सिडेटिव्ह तणावाचे हानिकारक परिणाम कमी करणाऱ्या विकरांची पातळीही वाढली होती. अंड्यांमध्ये शुष्कीकरण सहन करू शकणाऱ्या पॉलिमाईन्सचा संचय झाला.

dengu
Dhule Dengue News : शिरपूर येथे डेंगीचा उद्रेक; रुग्णालयांत गर्दी

एडिस इजिप्ती या डासांची अंडी पूर्णपणे शुष्कीकरण झाल्यानंतरही अनिश्चित काळासाठी स्वत:ला जिवंत ठेवू शकतात. शुष्कीकरणाच्या टप्प्यात तग धरण्यासाठी चयापचयच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करतात. त्यानंतर, पुन्हा पाणी उपलब्ध झाल्यानंतर पुनर्जिवित होतात. त्यांच्यातून अळ्या बाहेर पडतात.

- सुनील लक्ष्मण, संशोधक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com