Dental Health : अय्यो, दातांच्या आरोग्याचं थेट कनेक्शन तुमच्या मेंदूशी, वेळीच घ्या काळजी नाहीतर मेंदू...

दातांचं आरोग्य बिघडल्यामुळे तुम्हाला हिरड्यांचे आजार, पोकळी, मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यासह इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते
Dental Health
Dental Healthesakal

Dental Health : तुमचे दात खराब झाले असतील किंवा दातांचा त्रास असेल तर त्याचा त्रास फक्त तुमच्या दातांच्या जवळील भागाला होतो असे नाही. दातांच्या आरोग्याकडे दूर्लक्ष करण्याआधी तुम्ही दोनदा विचार करायलाच हवा. दातांचं आरोग्य बिघडल्यामुळे तुम्हाला हिरड्यांचे आजार, पोकळी, मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार यासह इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

अलीकडेच, जपानी संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात दातांचे खराब आरोग्य आणि मेंदूचे आकूंचन पावणे यांच्यातील संबंध आढळून आला आहे, हे सूचित करते की मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दातांचे चांगले आरोग्य राखणे आवश्यक आहे.

आरोग्याच्या अनेक समस्या गंभीर असू शकतात

हिरड्यांचे आजार, दातांमधील पोकळी आणि इतर अनेक आरोग्य समस्येमुळे (मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार) दातांचे आरोग्य बिघडू शकते. जपानच्या तोहोकू विद्यापीठाच्या संशोधनानुसार हिरड्यांचे आजार आणि दात पडणे हे मेंदूच्या आकुंचन पावण्याशी जोडलेले आहे, जे स्मृती आणि अल्झायमर रोगांस कारणीभूत आहे. याचा अर्थ दात किडणे किंवा हिरड्यांचे आजार उद्भवल्यास अल्झायमर रोग होऊ शकतो. (Adverse Effect on Teeth)

Dental Health
Brain Eating Amoeba : मेंदू खाणाऱ्या अमिबाचा भारतात बळी; केरळमध्ये १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू! नाकावाटे गेला शरीरात

अभ्यासातून नेमके काय पुढे आले?

जेव्हा संशोधकांनी चाचणीच्या सुरूवातीस आणि चार वर्षांनंतर निष्कर्षांची तुलना केली तेव्हा त्यांना दात पडणे आणि हिरड्यांचे आजार, तसेच मेंदूच्या डाव्या हिप्पोकॅम्पसमधील बदल यांच्यातील संबंध आढळला. (Dental Health)

हिरड्यांचा सौम्य आजार असलेल्या दोन्ही व्यक्ती ज्यांना कमी दात होते आणि ज्यांना जास्त दात होते अशा हिरड्यांचा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना डाव्या हिप्पोकॅम्पसमध्ये मेंदू संकुचित होण्याचे प्रमाण जास्त होते. मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दातांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. इतकेच काय, दातांच्या खराब आरोग्यामुळे मेंदूचा विकास मर्यादित होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com