
Dextromethorphan Hydrobromide Cough Syrup Usage, Benefits and Side Effects
sakal
बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेकशन होणं सामान्य गोष्ट आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सहसा डॉक्टर्स लहान मुलांना कफ सिरप देतात. मात्र राजस्थानमध्ये डेक्सट्रोमेथॉर्फन हायड्रोब्रोमाइड (Dextromethorphan Hydrobromide) या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील भरतपूर येथील ४ वर्षांच्या मुलीची तर जयपूरमधील २ वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर झाली आहे. इतकेच नाही तर सीकर जिल्ह्यातील ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
यानंतर राजस्थानमधील ड्रग कंट्रोलर विभागाने तात्काळ राज्यात सिरपचा वापर बंद करण्याचे आदेश दिलेअसून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.