World Health Day : दालचीनीचा चहा प्या अन् डायबिटीजला कंट्रोलमध्ये ठेवा

मुळात डायबिटीजला चांगली लाईफस्टाईल, जेवण आणि एक्सरसाईजमुळे कंट्रोल केले जाऊ शकते.
Diabetes Remedies
Diabetes Remedies sakal

Diabetes Remedies : बदलत्या लाईफस्टाईलमुळे आज अनेक लोक डायबिटीज आजाराने ग्रस्त आहे. डायबिटीजला मधुमेह नावानेही ओळखले जाते. शरीरात ग्लूकोजची मात्रा वाढल्यानंतर डायबिटीजचा त्रास होतो. काही लोकांना जन्मापासून हा आजार असतो.

मुळात डायबिटीजला चांगली लाईफस्टाईल, जेवण आणि एक्सरसाईजमुळे कंट्रोल केले जाऊ शकते. (Diabetes home Remedies drink cinnamon tea to control sugar )

इंडियन डायबिटीज फेडरेशन (आईडीएफ) नुसार भारतात जवळपास 7 कोटी लोकांना डायबिटीज आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या कोणालाही मधूमेह असेल तर तुम्ही किचेनमध्ये असलेल्या या मसाल्याचा उपयोग करू शकता.

हा मसाला तुम्हाला हेल्दी ठेवणार. हो, दालचीनी फक्त सुगंधच नाही तर स्वादही वाढवते आणि खूप कमी लोकांना माहिती असेल की दालचीनीमुळे मधुमेह आजार कंट्रोलमध्ये ठेवता येतो. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

Diabetes Remedies
Diabetes Remedies : घरातल्या या पदार्थांमूळे मधुमेह होणार छुमंतर; एकदा प्रयोग करायला काय हरकत आहे!

दालचीनीमध्ये फ्लेवोनोइड्स, एंटीऑक्‍सीडेंट आणि एंटी-व्हायरल गुण डायबिटीजला कंट्रोल करण्यास मदत करते. एक अभ्यासात सांगितल्याप्रमाणे दालचीनी टाइप 2 डायबिटीज आणि कोलेस्‍ट्रॉलच्या लेव्हेलला कंट्रोल ठेवण्यास मदत करते.

दालचीनीचे सेवन डायबिटीजशी निगडीत अल्जाइमर, हार्टचा आजार, इत्यादी कमी करण्यासाठी होतो. दालचीनीचे सेवन जर ग्रीन टी सोबत केले तर त्याचे फायदे द्विगिणित होतात.

Diabetes Remedies
Diabetes and Milk : डायबिटीज पेशंटनी दूध प्यावे का? तज्ञ सांगतात...

दालचीनीचा चहा बनविण्यासाठी सर्वात आधी दालचीनीचे पावडर आणि त्याची स्टीक एक कप पाण्यात उकळा आणि त्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर पाण्यात ग्रीन टी मिक्स करत 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून सोडून द्या. थोड्या वेळानंतर चहा गाळून घ्या.

लक्षात ठेवा की ग्रीन टीला कधीच उकळू नये. तुम्ही या चहाला सकाळी नाश्त्यात किंवा मिड मॉर्निंग ड्रिंक म्हणून पिऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com