Diabetes Patients : हिवाळ्यात डायबिटीस रूग्णांची इम्यूनिटी वाढवणारे 4 उपाय

हिवाळा येताच लोकांना सर्दी, खोकला, ताप असे इन्फेक्शन होऊ लागतात
Diabetes Patients
Diabetes Patientsesakal

Diabetes Patients : हिवाळा येताच लोकांना सर्दी, खोकला, ताप असे इन्फेक्शन होऊ लागतात; बदलत्या ऋतूमध्ये असे आजार होण अगदी शक्य आहे, पण या आजारांचं महत्वाच कारण म्हणजे व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणे.

Diabetes Patients
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सामान्य व्यक्ती विविध प्रकारचे काढे, भाज्या, फळे आणि सुका मेवा खातात. पण डायबीटीस असलेल्या रुग्णांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हे एका आव्हानापेक्षा कमी नाही.

Diabetes Patients
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

अनेक संशोधनात असे समोर आले आहे की 10 पैकी 7 डायबीटीक रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय योग्य आहे हे समजत नाही. डायबीटीक रुग्णांच्या या समस्या लक्षात घेऊन 4 महत्वाच्या टिप्स तज्ञांनी दिल्या आहेत. या टिप्सचे पालन केल्याने, डायबीटीक रुग्ण केवळ त्यांची प्रतिकारशक्ती वाढवू शकत नाही तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सुद्धा मेंटेन ठेवू शकतात.

Diabetes Patients
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

डायबीटीक पेशंटमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या 4 टिप्स

1. स्ट्रेस नियंत्रित करा

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस, स्ट्रेसमुळे केवळ प्रतिकारशक्तीच कमकुवत होत नाही तर संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते. मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि व्यायामाचा आधार घ्या. पुस्तके वाचा, शक्यतो एकटे राहणे टाळा. लक्षात घ्या की शरीरावर आणि मनावर जितका ताण कमी होईल तितकी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील.

Diabetes Patients
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

2. व्यायाम

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग आणि व्यायाम सर्वोत्तम मानले जातात. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे, जर तुम्हाला योगा किंवा व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडण्याची भीती वाटत असेल, तर घरीच तुमच्या खोलीच्या 10 ते 15 फेऱ्या करा. याशिवाय योगाचीही मदत घेऊ शकता. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी दिवसातून किमान 30 मिनिटे योगासने किंवा व्यायाम करा.

Diabetes Patients
New Year Astrology : 'या' राशींना मिळणार नवीन वर्षात त्यांचं खर प्रेम

3. शरीराला हायड्रेट ठेवा

हिवाळ्यात, लोक कमी प्रमाणात पाणी पितात, ज्यामुळे त्यांचे शरीर योग्यरित्या हायड्रेट होऊ शकत नाही. शरीरात पुरेसे पाणी न मिळाल्याने रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाचे पाणी प्या. डायबीटीक रुग्णांना दिवसातून 200 मिली नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Diabetes Patients
Farali Misal Recipe : शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

4. पुरेशी झोप घ्या

ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण झोप ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधनात असे समोर आले आहे की, जी व्यक्ती दररोज 6 ते 7 तास पुरेशी झोप घेते, त्यांची प्रतिकारशक्ती 4 ते 5 तास झोप घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक मजबूत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com