Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

कोविड 19 जातोय जातोय म्हणत परत आता नवीन व्हेरियंटने समोर येताना दिसत आहे
Heart And Covid-19
Heart And Covid-19 esakal

Heart And Covid-19 : कोविड 19 जातोय जातोय म्हणत परत आता नवीन व्हेरियंटने समोर येताना दिसत आहे बाहेरच्या देशात परत लॉकडाऊन लागण्याच्या बातम्या समोर येता आहेत. आजही कोविड 19 बद्दल पूर्ण माहिती झालेली नाहीये, रोज नवीन रिपोर्ट समोर येता आहेत. त्यात अजून एक रिपोर्ट आला आहे ज्याच्या मते कोविड 19 झालेल्या लोकांना हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता आहे.

Heart And Covid-19
Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या?

नेचर कम्युनिकेशन्स बायोलॉजी लॅबमध्ये केलेल्या परीक्षणाचा रिपोर्ट प्रकाशित केला गेला आहे. अमेरिकेच्या बाल्टिमोर मधल्या मेरीलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनातून हृदयविकाराचा झटका कोणत्या विषाणूंनी येऊ शकतो यावर एक रिसर्च रिपोर्ट तयार केला.

Heart And Covid-19
Health News : भरड धान्य खा, अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!

शरीराच्या विविध अवयवांवर कोविड-19 मुळे SARS-CoV-2 विषाणूचे हानिकारक परिणाम झालेले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही जवळजवळ वर्षभर हृदयाच्या आजारांचा संभाव्य धोका असतो. अनेकांना अँसिडीटीचा त्रास होतो. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या, हृदयाची अनियमित लय, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल होऊ शकते.

Heart And Covid-19
Aryan Khan Lifestyle : आलिशान कार अन् महागड्या कपड्यांचा शौकीन आहे आर्यन

व्हॅक्सिन आणि इतर औषध असूनही, कोविड-19 संसर्गाच्या हानीपासून हृदय आणि इतर अवयव नेहमीच सुरक्षित राहू शकतात अस नाही. Nsp6 हे SARS-CoV-2 चे प्रोटीन सर्वात धोकादायक आहे.

Heart And Covid-19
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

झे हान या प्रसिद्ध सायन्स राईटरच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की प्रत्येक SARS-CoV-2 प्रोटीन शरीरातील विशिष्ट अवयवांना वैयक्तिकरित्या हानी पोहोचवू शकतात, ज्यांची एचआयव्ही आणि झिका या आजारांच्या विषाणूंशी तुलना करू शकतो.

Heart And Covid-19
Christmas Holiday : नाताळमुळे शाळांना सुट्या; चिमुकल्यांत उत्साह

त्यांनी आजार झालेल्या रुग्णांवर उपचार करतांना त्यांच्या शरीरातला प्रत्येक टिशू रिकव्हर होत असतांनाच्या प्रोसेसला समजून घेतल.हॉपकिन्स मेडिसिनने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की हृदयविकाराचा झटका विविध प्रकारात येतो.

Heart And Covid-19
Christmas Festival : नाताळसाठी सजल्या बाजारपेठा; सजावटीच्या वस्तूंना मागणी!

टाइप 1 हा क्वचित घडतो, जो कोविड-19 च्या रिकव्हरी दरम्यान किंवा नंतर हृदयाच्या धमन्यांपैकी एकामध्ये अडथळा आणणाऱ्या रक्ताच्या गुठळ्यामुळे येतो.

टाइप 2 हृदयविकाराचा झटका वारंवार येतो. याचा त्रास त्यांना होतो ज्यांना अति काम करायचं असतं आणि त्यासाठी हृदयाच्या स्नायूंना रक्तात पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे, स्ट्रॉक येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com