- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आज जगभरात मधुमेह हा ‘लाइफस्टाइल डिसीज’ म्हणून ओळखला जातो. एकदा मधुमेह झाला, की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात असा आपला समज आहे; पण फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मधुमेह ही केवळ रक्तातील साखरेची समस्या नाही, तर मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्याचं मूळ कारण आपल्या जीवनशैलीत दडलेलं आहे. त्यामुळे योग्य बदल करून डायबेटिस रिव्हर्स करणं पूर्ण शक्य आहे.