मला गेल्या १५ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. बरीच पथ्ये पाळतो, औषधेही घेतो, पण गेले काही दिवस साखर नियंत्रणात राहत नाही असे आढळले आहे. औषधे वाढवली पण फारसा फरक दिसत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कदाचित इन्शुलिन सुरू करावे लागेल, असे दिसते. काही उपाय सुचवावा. कारण मला इंजेक्शनची फार भीती वाटते.
- सुरेश खरे, मुंबई
उत्तर - मधुमेह हा आजार फक्त साखर नियंत्रणात ठेवण्याने बरा होत नाही. तर उत्तरोत्तर औषधांची संख्या व मात्रा वाढून इन्शुलिनपर्यंत जाण्याची वेळ बहुतांशी रुग्णांवर येते. मधुमेहावर कार्य करण्यासाठी अग्नीचे कार्य सुधरवणे महत्त्वाचे आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. यासाठी सर्वप्रथम संतुलनच्या शास्त्रोक्त पंचकर्मासाठी वेळ काढणे उपयुक्त ठरू शकेल. पंचकर्माने शरीरातील आम कमी झाला की इतर अवयवांबरोबरच यकृत व पॅनक्रियाज् या अवयवांचे कार्य व्यवस्थित होऊ लागते. त्यामुळे पचन सुधारून साखरेचे रक्तातील प्रमाण कमी होते. पंचकर्मानंतर आहार व आचरण यांची काळजी घेतली तर साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. कार्ला येथे पंचकर्म केल्यानंतर इन्शुलिनची मात्रा कमी वा पूर्णपणे बंद होते असा अनुभव आहे. रोज नियमाने किमान अर्धा तास चालायला जाणे, सूर्यनमस्कार घालणे, १०-१५ मिनिटे उन्हात बसणे हे पचनासाठी उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेदाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रकृतीनुसार औषधोपचार सुरू करण्याचा उपयोग होऊ शकेल.