Bone Cancer | ही साधीसुधी दुखणी असू शकतात हाडांच्या कर्करोगाची लक्षणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bone Cancer

Bone Cancer : ही साधीसुधी दुखणी असू शकतात हाडांच्या कर्करोगाची लक्षणे

मुंबई : हाडांमधील पेशी नियंत्रणाबाहेर गेल्यावर हाडांचा कर्करोग दिसून येतो. परंतु, या प्रकारच्या कर्करोगाबद्दल नागरिकांना फारशी माहिती नसते. बहुतेक वेळा, हाडांच्या गाठी सौम्य असतात.

तसेच सौम्य ट्यूमर फारसे घातक नसतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतही नाहीत. हाडांच्या गाठी शरीरातील कोणत्याही हाडांवर परिणाम करू शकतात. याबाबत सांगत आहेत एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुहास आग्रे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

हेही वाचा: Physical Relation : वैवाहिक जीवनातील सामान्य लैंगिक समस्यांवर अशी करा मात

हाडांची गाठ जसजशी वाढते तसतशी ती निरोगी ऊती नष्ट करते आणि हाडं कमकुवत करते, ज्यामुळे एखाद्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.

हाडांच्या कर्करोगाची लक्षणे म्हणजे ताप येणे, हाडांमधील वेदना आणि सूज, अचानक वजन कमी होणे, थकवा येणे, चालताना त्रास होणे, रात्रीच्या वेळी घाम येणे, शारीरिक हालचाल करताना अडचणी येणे, हाडांमधील गाठ, फ्रॅक्चर आणि सांध्यामध्ये ताठरता जाणवणे.

हाडांचा कर्करोग सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो आणि ही एक चिंतेची बाब आहे. मात्र, या प्रकारच्या कर्करोगाचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

निदान :

डॉक्टर नेहमी सुचवतात अशा चाचण्या म्हणजे हाडांचे स्कॅन, संगणकीकृत टोमोग्राफी (CT), एमआरआय आणि एक्स-रे. योग्य निदान झाल्यानंतर तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवतात.

हेही वाचा: Relationship Tips : शारीरिक संबंधांसाठी जोडीदाराला कसं आकर्षित कराल ?

उपचार :

हाडांच्या कर्करोगावरील उपचार हे ट्यूमरचा प्रकार आणि स्थान यावर अवलंबून असतात. खालील उपचार हे एखाद्याला कर्करोगाशी सामना करण्यासाठी सुचविले जातात.

• शस्त्रक्रिया : ट्युमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले जाते. काढून टाकण्यात आलेल्या कमकुवत हाडाच्या जागी शरीराच्या दुसर्‍या भागातील काही हाडांसह, धातू आणि प्लॅस्टिकच्या वापराने प्रत्यारोपण करतात. शस्त्रक्रिया ही केवळ अनुभवी तज्ज्ञाद्वारेच केली पाहिजे.

• केमोथेरपी : एखाद्याला केमोथेरपीची निवड करण्यास देखील सांगितले जाते. ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींवर मात करण्यासाठी कॅन्सरविरोधी औषधे ही स्नायुंद्वारे दिली जातात.

केमोथेरेपीच्या किती फेऱ्यांची आवश्यकता आहे हे तुमचे डॉक्टर ठरवतील. दुसरा पर्याय म्हणजे रेडिएशन थेरपी ज्यामध्ये एक्स-रे कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी वापरतात.

• ट्युमर संकुचित करुन ते काढून टाकणे हे रेडिएशन थेरपीचे मुख्य उद्दिष्ट असते. जेव्हा शस्त्रक्रियेनंतरही कर्करोगाच्या पेशी राहतात तेव्हा शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी एकत्रितपणे वापरली जाऊ शकते.

• काहींना टार्गेटेड थेरपी घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. हे कर्करोगाच्या अशा विशिष्ट जनुकांना आणि प्रथिनांना लक्ष्य करते जे कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत ठरतात.

अशा प्रकारच्या उपचारांमुळे निरोगी पेशींचे नुकसान मर्यादित होते आणि केवळ कर्करोगग्रस्त पेशींवरच हल्ला होतो. हाडांचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत आढळल्यास त्याचे व्यवस्थापन करणे शक्य आहे.

सूचना - या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी असून कोणत्याही प्रकारच्या उपचारांसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :CancerBone Health