Monsoon Diarrhea Symptoms: पावसाळ्यात डायरियाचा कहर! डॉक्टरांनी दिल्या आरोग्य टिकवण्यासाठी खास टिप्स

How to Prevent Diarrhea During Monsoon Season: पावसाळ्यात अतिसाराचे रुग्ण वाढत असून, डॉक्टरांनी दिलेल्या सोप्या टिप्समुळे आरोग्य टिकवता येईल.
Doctor Recommends Health Tips to Avoid Diarrhea During Monsoon Season
Doctor Recommends Health Tips to Avoid Diarrhea During Monsoon Seasonsakal
Updated on

थोडक्यात:

  1. पावसामुळे दूषित पाणी व अस्वच्छ अन्नामुळे शहरात अतिसाराचे रुग्ण वाढले आहेत.

  2. जानेवारी ते जूनदरम्यान एकूण ५५१८ रुग्ण आढळले असून जून महिन्यात सर्वाधिक १२२६ रुग्ण नोंदले गेले.

  3. आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Simple Home Remedies for Diarrhea in Rainy Season: पडलेला पाऊस, दूषित पाणीस्‍त्रोत, अस्‍वच्‍छ व उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे यामुळे शहरात अतिसाराचे (डायरिया) रुग्ण वाढले आहेत. यंदा शहरात जून महिन्‍यात १२२६ रुग्णांचे निदान झाले आहे तर, जानेवारी ते जून या सहा महिन्यांत साडेपाच हजार रुग्‍ण आढळले आहेत. गेल्या वर्षी रुग्ण संख्या साडेनऊ हजारांवर पोहोचली होती. याबाबत आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिसाराच्या रुग्णाला दिवसातून वारंवार पातळ शौचास होते. यामध्ये शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होऊ शकते. अतिसार प्रामुख्याने दूषित अन्न किंवा पाणी, जंतुसंसर्ग, विषाणू किंवा अपचनामुळे होतो.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दूषित पाणी आणि अन्न हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे. पावसाळ्यात जलस्रोतांमध्ये प्रदूषित पाणी मिसळल्यामुळे किंवा घरातील पाणी साठवण्‍याच्‍या टाक्‍या, भांडी अस्‍वच्‍छ असल्‍यास पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कमी होते व अतिसाराला निमंत्रण मिळते. सार्वजनिक टाक्यांमधील पाणी स्वच्छ न ठेवणे, जलवाहिनीतून गळती होणे आणि अस्वच्छ ठिकाणचे अन्नपदार्थ खाण्यामुळे अतिसार होण्याचे प्रमाण वाढते.

Doctor Recommends Health Tips to Avoid Diarrhea During Monsoon Season
World Hepatitis Day 2025 : कावीळचा होतो थेट यकृतावर परिणाम; वेळेवर निदान अन् उपचार केल्यास टाळता येते गुंतागुंत

अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांना पातळ मल, उलटी, अशक्तपणा आणि कधी कधी ताप येतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तींना धोका अधिक असतो. प्रत्‍येक महिन्‍यात शहरात सर्वसाधारणपणे आठशे रुग्‍ण आढळून येतात.

अतिसार दूषित पाण्याद्वारे होतो. पाणी उकळून प्यायल्यास आणि स्वच्छता बाळगल्यास हा आजार टाळता येतो. सध्‍या ही रुग्‍णसंख्‍या वाढली असली तरी नागरिकांनी दूषित पाणी आणि अन्नाचे सेवन टाळावे.

- डॉ. सुनील पवार, पोटविकारतज्ज्ञ

ही खबरदारी घ्या

  • पिण्याचे पाणी उकळून किंवा फिल्टर केलेले प्यावे

  • बाहेरची कापलेली फळे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावेत

  • शौचानंतर व स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत

  • लहान मुलांना साखर-मीठ घालून घरीच ‘ओआरएस’चे द्रावण द्यावे

  • उलटी किंवा पातळ जुलाब झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Doctor Recommends Health Tips to Avoid Diarrhea During Monsoon Season
Parkinson's Cases Rise: डोपामीनची कमतरता, हालचालींचा गोंधळ; पार्किन्सनग्रस्त पुढील दशकात होणार दुप्पट!

मागील सहा महिन्यांतील रुग्णसंख्या

  • जानेवारी - ८५९

  • फेब्रुवारी-८६२

  • मार्च- ८१७

  • एप्रिल -८४३

  • मे - ९११

  • जून -१२२६

  • एकूण - ५५१८

FAQs

  1. अतिसार (डायरिया) नेमका कशामुळे होतो? (What causes diarrhea?)
    अतिसार प्रामुख्याने दूषित अन्न व पाणी, विषाणू किंवा बॅक्टेरियांचा संसर्ग, अपचन आणि अस्वच्छतेमुळे होतो.

  2. अतिसाराची लक्षणे कोणती असतात? (What are the symptoms of diarrhea?)
    पातळ शौच, उलटी, अशक्तपणा, डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), कधी कधी ताप येणे ही अतिसाराची सामान्य लक्षणे आहेत.

  3. अतिसार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? (What precautions can be taken to prevent diarrhea?)
    पाणी उकळून किंवा फिल्टर करून प्यावे, उघड्यावरचे अन्न व कापलेली फळे टाळावीत, हात धुण्याची सवय ठेवावी, लहान मुलांना ओआरएस द्यावे आणि लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  4. अतिसार अधिक कोणाला होण्याची शक्यता असते? (Who is more vulnerable to diarrhea?)
    लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना अतिसाराचा धोका अधिक असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com