

Digital Strain Causing Dry Eye in Youth
sakal
Health News Marathi: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि संगणक या गॅजेट्सचा वापर तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, नोकरी, मनोरंजन आणि सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे अनेक तरुण-तरूणी दररोज तासन्तास स्क्रीनकडे पाहत असतात. मात्र, या सवयींमुळे तरूणाईंच्या डोळ्यांवर गॅजेट्सचा ताण येत असल्याचे चित्र दिसत आहे. ड्राय आय सिंड्रोम म्हणजेच, डोळ्यांचा कोरडेपणा ही समस्या झपाट्याने वाढत आहे.