- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेदिक उपचारांमध्ये सगळ्यांत महत्त्वाचे व सगळ्यात उपयोगी ठरणारे उपचार म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक या तिन्ही पातळ्यांवर दोषरहित अवस्था आणण्याकरता पंचकर्म उपचारांचा खूपच फायदा होतो. आत्मसंतुलन केंद्रात गेली ४३ वर्षे लाखों रुग्णांवर अप्रतिम परिणाम पाहायला मिळत आहेत.