
natural cough syrup children
Sakal
लहान मुलांच्या खोकल्यावर घरगुती उपायांचा वापर करणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले उपाय मुलांच्या गळ्यातील खवखव कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे उपाय रासायनिक दुष्परिणामांपासून मुक्त असून, मुलांच्या संवेदनशील शरीरासाठी योग्य आहेत.
safe alternatives to cough syrup : बदलत्या वातावरणात लहान मुलांना होणारा खोकला हा पालकांसाठी काळजीचा विषय असतो. तसेच आजकाल कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहे. यामुळे रासायनिक कफ सिरप ऐवजी नैसर्गिक गोष्टी लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून काढा बनवल्यास लहान मुलांचा खोकला कमी करता येतो. यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच हा काढा एक वर्षावरील मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. हा काढा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.