
Beyond the festive glow: Diwali is a test of your body's metabolic balance.
Sakal
डॉ. मृदुल देशपांडे -
दिवाळी म्हटलं की गंध, रंग, आनंद आणि अर्थातच फराळ. चकल्या, करंज्या, लाडू आणि शंकरपाळ्यांचा सुवास घरभर दरवळतो. सण म्हणजे उत्साहाचं प्रतीक; पण त्याचवेळी शरीरासाठी एक आव्हानही. कारण या दिवसांत आपली खाण्याची लय (eating pattern), झोप, आणि शरीराची अंतर्गत रासायनिक ताळमेळ (metabolic hormony) थोडी विस्कळित होते. फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टीकोनातून पाहिलं, तर दिवाळीचा काळ म्हणजे सजगतेने खाण्याची एक उत्तम संधी असते.