Health : गरम पदार्थांमध्ये लिंबू किंवा लिंबूचा रस टाकू नये, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health news

Health : गरम पदार्थांमध्ये लिंबू किंवा लिंबूचा रस टाकू नये, कारण...

लिंबू हा भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. वजन कमी करण्यापासून ते जेवणाची चव वाढवण्यापर्यंत लिंबूचा वापर केला जातो. लिंबूचा वापर केल्याशिवाय सलाड आणि चाटमध्ये चव येते नाही. लिंबूमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तोंडाची चव वाढवण्याचं काम लिंबू करत असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई असते. लिंबू हे फोलेट, नियासिन, थायामिन, रिबोफ्लेविन यांचाही चांगला स्रोत आहे. तुम्ही आवडीनुसार कोणत्याही डिशमध्ये लिंबांचा रस टाकू शकता. परंतु आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, लिंबूचा रस गरम वस्तूंवर पिळून नये. गरम अन्न किंवा गरम पेयांमध्ये लिंबाचा रस घालणे आरोग्यासाठी चांगले नाही.

हेही वाचा: Pickle Recipe : मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचं लोणचं कसं बनवाल?, ट्राय करा रेसिपी

गरम जेवणात लिंबू किंवा लिंबूचा रस का टाकू नये?

बर्‍याच वेळा आपण डिश सजवताना किंवा एखादा पदार्थ शिजवताना त्याला चविष्ट बनण्यासाठी लिंबाचा रस टाकतो. लिंबू टाकल्याने त्याची चव वाढते यात शंका नाही. मात्र या लिंबूमुळे म्हणजेच गरम अन्नामध्ये व्हिटॅमिन सी टाकल्याने व्हिटॅमिन सीचा पौष्टिकता कमी होते. व्हिटॅमिन सी उष्णतेसाठी अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे काही इतर आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन सी मधील पोषक घटक उष्णतेच्या संपर्कात आल्याने पातळ होण्याचे कारण म्हणजे व्हिटॅमिन सीमध्ये एस्कॉर्बिक ऍसिड असते. उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यावर ते जलद खराब होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो.

आयुर्वेदात लिंबूला विशेष स्थान

लिंबाच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यातील एक म्हणजे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेच शिवाय घशातील संसर्ग, ऍसिडिटी, पायरिया, ताप, लठ्ठपणा इत्यादी आरोग्य समस्यांवरही लिंबू प्रभावीपणे काम करतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात लिंबूचा समावेश करू शकता. याशिवाय सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी कोमट पाणी पिल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा: Recipe : घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईलचे दही शोले; सोपी रेसिपी नक्की ट्राय करा..

Web Title: Do Not Squeeze Lemon On Hot Things Health News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..