
Cough Home Remedies : खोकल्याचा त्रास वाढलाय? या घरगुती उपायांनी झटक्यात दूर होणार खोकला
Cough Home Remedies : सध्या वातावरणात अचानक बदल झाल्याने सगळीकडे व्हायरल, सर्दी, खोकला ताप याची साथ सुरू आहे. अनेकदा सर्दी ताप हा औषधाने बरा होतो पण खोकल्याचा मात्र तसं नसतं. अनेकदा खूप औषध घेऊनही खोकला बरा होत नाही.
अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर असतात ज्यामुळे खोकल्याचा त्रास झटक्यात दूर होणार. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. ( do you have Cough read Home Remedies)
खोकल्यासाठी आलं हे खूप जास्त फायदेशीर आहे. जर तुम्ही आलं आणि मीठ एकत्र मिक्स करुन दाढेखाली ठेवलं तर त्यातून निघणारा रस हा खूप फायदेशीर ठरतो ज्यामुळे खोकला हा झटक्यात पळतो. फक्त पाच मिनिटे हे तोंडात ठेवावं त्यानंतर तोंड स्वच्छ धुवावं.
खोकलासाठी मध हे खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही कोमट पाण्यात मध मिक्स करुन पिलात तर तुमचा खोकल्याला आराम पडेल.
खोकल्याचा अति त्रास असणाऱ्यांनी हळदीचं दूध हे नियमित प्यावं. यामुळेही खोकला येणे बंद होतं. हळद हे गुणकारी आहे. जे खोकल्यावर लगेच मात करतं.
खोकल्याचा त्रास असेल तर गुळ हे कोमट पाण्यात मिक्स करुन प्यावे. यामुळे खोकल्याला आराम पडतो.