Signs Of Lung Damage : पायऱ्या चढताना दम लागतोय? हलक्यात घेऊ नका, या 5 आजारांपैकी असू शकतो 1 आजार

पायी चालणे, पायऱ्या चढणे यांसारख्या साध्या सोप्या हालचाली करूनसुद्धा थकवा जाणवतो. ही लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचीही असू शकतात
Signs Of Lung Damage
Signs Of Lung Damageesakal

Signs Of Lung Damage : बरेचदा आपण फार काम केलं की थकवा जाणवतो. मात्र तुम्हाला अगदी पायऱ्या चढतानाही थकवा जाणवत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याच लोकांना पायी चालणे, पायऱ्या चढणे यांसारख्या साध्या सोप्या हालचाली करूनसुद्धा थकवा जाणवतो. ही लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचीही असू शकतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

श्वास फुलून येणे किंवा फार दम लागणे ही लक्षणं दिसल्यास तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यात बिघाड झाल्याचे कळते. तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधल्यास यावर निदान शक्य आहे.

हेल्थडायरेक्टच्या मते, फुफ्फुसांचा आजार, हृदयाचा आजार, इन्फेक्शन, पॅनिक अटॅक आणि फुफ्फुसांच्या नसांत ब्लॉकेड असल्यास तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. खोकला, घाबरल्यासारखे वाटणे, छातीचे दुखणे, शिंका येणे, नाक बुजणे, गळ्यात दुखणे यांसारखीही लक्षणं तुम्हाला दिसून येतील. ही लक्षणं हलक्यात घेऊ नका, वेळीच डॉक्टरांना दाखवा. (Health)

Signs Of Lung Damage
Lung Cancer Day : फुफ्फुसांचं नुकसान होण्यास सुरुवात झाली की दिसतात ही लक्षणं, घरी या पद्धतीने चेक करा

वातावरणात बदल झाल्यास व्हा सावध

हवामान बदलले की श्वसनाचे आजार गंभीर होतात. यावेळी विषाणू आणि बॅक्टेरियाचा धोका वाढतो, ज्यामुळे तुमच्या विंडपाइपमध्ये जळजळ होऊ शकते. तेव्हा वातावरणात बदल झाल्यास आरोग्य जपा. (Lungs)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com