
Doctors Turn Actors to Raise Breast Cancer Awareness
sakal
Breast Cancer Awareness: आजाराची कुणकुण लागल्यास त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासह कौटुंबिक जबाबदारी, भावनिक घुसमट, जोडीदारामध्ये जागृतीचा अभाव यामुळे होणारा उशीर स्त्रीच्या जिवावर बेतू शकतो. याबाबत वरिष्ठ कर्करोग शल्यविशारद (कॅन्सर सर्जन) डॉ. शेखर कुलकर्णी यांनी डॉक्टरकीच्या मर्यादा ओलांडत स्वतः लिखाण, दिग्दर्शन व अभिनयाचे आव्हान पेलत स्तन कर्करोग या विषयावर अर्ध्या तासाचा 'मर्दोवाली बात' हा लघुपट तयार केला.