Health: बिअर प्यायल्याने कमी होतंय कोलेस्ट्रॉल? रोज पिण्याऱ्यांनी वाचाच… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cholesterol and Beer

Health Tips : बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतंय? काय सांगतो अहवाल...

Cholesterol and Beer: बिअर हे असे पेय आहे जे सहसा सगळ्याच पार्टींमध्ये प्यायलं जातं. अनेकांना रोज बिअर पिण्याची सवय असते अन् याबाबत वारंवार चर्चा होत असते त्याचे फायदे आणि तोटे याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. बर्‍याच रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, मर्यादित प्रमाणात बिअर पिल्याने शरीराला खूप फायदे होतात.  

पण याचा अर्थ असा नाही की रोज बिअर प्यायली पाहिजे. काही रिपोर्ट्सनुसार, बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. नक्की खरं काय?... जाणून घ्या...

बिअर खरंच कोलेस्ट्रॉल कमी करते का?

बिअर पिण्याबाबत विविध दावे केले जातात.  काही अभ्यासानुसार, बिअरमध्ये अल्कोहोलची पातळी ५ ते ७ टक्क्यांपर्यंत असते, यात अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स असतात. काही अहवालांमध्ये असं म्हटलं आहे की ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही बिअर मदत करू शकते. पण यासाठी त्याच्या प्रमाणाची काळजी घ्या.

डायबीटीस अन् बिअर

कोणत्याही प्रकारचे अल्कोहोलिक पेय पिल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी जास्त होऊ शकते. अहवाल असं सुचवतात की, “जे पुरुष अधूनमधून बिअर पितात त्यांच्यापेक्षा जे पुरुष पित नाहीत अशा लोकांना डायबीटीसचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.  अभ्यासानुसार, कमी प्रमाणात बिअर प्यायल्याने पुरुषांमध्ये डायबीटीसपासून संरक्षण करते. 

निरोगी राहण्यासाठी आणखी पर्याय आहेत

बिअर कमी प्रमाणात पिणे तुमच्या शरीराला सकारात्मक मार्गाने मदत करू शकते, याचा अर्थ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे असं नाही. आपण निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. याशिवाय, तज्ञांच्या मते, महिलांसाठी एक पेग आणि पुरुषांसाठी जास्तीत जास्त दोन पेग घेणं आरोग्यदायी मानले जाते.