Doctors Warn of Dolo 650 Overdose Side Effects
sakal
Why You Should Stop Popping Dolo 650 Instantly: थोडी कणकण आहे, डोकं दुखतंय किंवा शरीरात कुठेही वेदना होत असेल तर आपल्या भारतात डॉक्टरांना न विचारता एक गोळी डोळे झाकून सर्वात जास्त घेतो, ती म्हणजे डोलो-650. अलीकडेच ही गोळी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. अमेरिकेमधील गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट व हेल्थ एज्युकेटर डॉ. पलानीअप्पन मणिकम यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, “भारतीय डोलो 650 कॅडबरी जेम्ससारखी खातात.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांच्या औषधं वापरण्याच्या सवयींवर पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र या सवयींवर गांभीर्यांने विचार करण्याची गरज असून डोलो गोळीबद्दल संपूर्ण माहिती करून घेऊनच ती घेतली पाहिजे.