मनाची शक्ती : सकारात्मक राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stay Positive

मनाची शक्ती : सकारात्मक राहा

- डॉ. हंसा योगेंद्र

सकारात्मकता ही मनाची अवस्था आहे. काही लोकांमध्ये कुठेही आनंदी राहण्याची क्षमता असते, तर काहींमध्ये कुठेही असले तरी कायम दुःखी राहण्याची कला बाळगून असतात. आपल्या डोक्यावरील छत एका सुंदर झुंबराने सजवलेले असेल. त्यामध्ये शेकडो दिवे असतील, परंतु फक्त एक दिवा काम करत नसेल, तर आपल्यापैकी बहुतांश व्यक्ती झुंबराचे कौतुक करण्याऐवजी बंद असलेल्या दिव्याकडेच लक्ष वेधतील.

सकारात्मक आणि संतुलित मनःस्थितीत राहणे हे आपले सर्वप्रथम आणि प्रमुख कर्तव्य आहे. जीवनात चढ-उतार नक्कीच असतात; अगदी बालपणापासून चढ-उतार अनुभवत असता. लहानपणी आपण चालायला शिकत असताना अनेकदा पडतो, उठतो पुन्हा पडतो पडतो आणि पुन्हा पुन्हा उठतो. आपल्याला दुखापत होते, परंतु हार मानत नाही आणि प्रयत्न करणे थांबवत नाही. कारण आपल्याला चालणे, धावणे आणि याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा असतो.

वरील उदाहरणानुसार आपणही आयुष्यात कधीतरी पडणार म्हणजे वाईट काळ येणार त्यावेळी पुन्हा उठायला शिकले पाहिजे. आणि आपण सकारात्मकरीत्या विचार करून त्याचा वारंवार सराव म्हणजे मनाला बजावायला शिकल्यास आयुष्यात अनेक गोष्टी आपण सहजतेने करू शकतो. योगामध्ये सराव (तप, प्रयत्न) महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या गोष्टीचा दुसरा स्वभाव होईपर्यंत सराव करावा लागतो.

आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या पाच गोष्टींची यादी बनवा. आणि सूचीतील कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती न करण्याचा प्रयत्न करा. काही आठवड्यांनंतर, लक्षात येईल की, तुमच्याकडे आभार मानण्यासारखे बरेच काही आहे. पेला अर्धा रिकामा दिसण्याऐवजी निश्चितच अर्धा भरलेला दिसेल.

आपण धावपळीत आयुष्य घालवतो. परंतु थांबा, थोडा वेग कमी करा, कुठेतरी स्थिर व्हा. खोलवर श्वास घ्या. तुमचा श्वास मंदावतो तेव्हा जग मंदावते. या संथ क्षणात, जेव्हा जीवन जवळजवळ शांतपणे थांबते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकामध्ये देवत्व पाहू शकाल. या मनःस्थितीत, सकारात्मक आणि संतुलित राहणे अधिकच सोपे होते.

नेहमी संतुलन राखा. हे करण्यासाठी, तुम्हाला आजूबाजूला सकारात्मकता पाहावी लागेल, तुम्हाला जीवनाचे कौतुक करावे लागेल. प्रत्येक वेळी सकारात्मक राहणे इतके सोपे नाही. कारण एखादी गोष्ट तुम्ही ठरविलेल्या मार्गाने जात नसल्यास तुम्ही सकारात्मक होऊ शकत नाही. सकारात्मक राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या अवतीभवती देवत्व पाहावे लागेल. प्रत्येक गोष्टीत देवत्व दिसले पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी गृहीत धरता त्या सर्व चमत्कार आहेत हे लक्षात आल्यावर तुम्ही सकारात्मक व्हाल.

टॅग्स :health