आरोग्य‘चेतना’ : मायग्रेनला ‘चालना’ देणारे घटक

मायग्रेन हा केवळ डोकेदुखी नसून अतिसंवेदनशील मेंदूचा क्रॉनिक आजार; आहार, झोप, ताण, प्रकाश, वास, हवामान आणि औषधांचा अतिरेक हे विविध ‘ट्रिगर्स’ ओळखल्याशिवाय नियंत्रण अशक्य
Dr. Jaydev Panchawade's guide on identifying and managing migraine triggers for chronic sufferers

Dr. Jaydev Panchawade's guide on identifying and managing migraine triggers for chronic sufferers

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

मायग्रेन हा केवळ डोकेदुखीचा प्रकार नसून, तो अतिसंवेदनशील मेंदूचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि ‘क्रॉनिक’ आजार आहे. बाह्य तसेच अंतर्गत वातावरणातील अनेक घटक या मेंदूला एका विशिष्ट सहनशक्तीपलीकडे ढकलून मायग्रेनचा झटका आणतात. त्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘ट्रिगर्स’ म्हटले जाते. ट्रिगर्स हे आजाराचे मूळ कारण नसतात; ते एका रिकाम्या भांड्यात थेंबथेंब साठणाऱ्या पाण्यासारखे असतात. दिवसभरात जेव्हा असे तीन-चार ट्रिगर्स एकत्र येतात, तेव्हा भांडे काठोकाठ भरून वहावे तशी डोकेदुखी सुरू होते. या ट्रिगर्सची अचूक ओळख करून घेणे, हा मायग्रेन नियंत्रणातील सर्वांत प्रभावी आणि आवश्यक उपाय मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com