जुनाट आजाराशी कसं लढायचं?

गेल्या भागात आपण आजाराशी लढताना नेमकं कोणती पाउलं उचलायची हे पाहिलं. विशेषकरून आपण आजार होऊ नये म्हणून (आजार होण्यापूर्वी) कोणती पाऊलं उचलायची.
Health
HealthSakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

गेल्या भागात आपण आजाराशी लढताना नेमकं कोणती पाउलं उचलायची हे पाहिलं. विशेषकरून आपण आजार होऊ नये म्हणून (आजार होण्यापूर्वी) कोणती पाऊलं उचलायची, म्हणजेच प्रीव्हेंशन कसं करायचं हे पाहिलं! आता आपण आजाराचं निदान झाल्यानंतर कोणत्याही जुनाट आजाराशी दोन हात कसे करायचे ते पाहूया.

आजारानंतर उचलण्याची पाऊलं

डॉक्टरकडून आजार समजून घेणं. जर आजार आधीच खूप पुढच्या पायरीवर असेल किंवा तपासण्याचे रिपोर्ट खूप चिंताजनक असतील, तर डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार सुरू करणं. मात्र, रिपोर्टप्रमाणे आजार आत्ताच सुरू झाला असेल किंवा तो बॉर्डरलाइन आकडे दाखवत असेल, तर मात्र आपण डिसीज रिव्हर्सलसाठी प्रयत्नशील राहू शकतो. (उदाहरणार्थ, शुगर अत्यंत जास्त प्रमाणात असेल, तर ती कमी करण्यासाठी औषधोपचार घ्यायलाच हवेत; पण ती जास्त वाढलेली नसेल आणि इतर कोणताही आजार नसतील, तर अाहारावर नियंत्रण ठेवून, व्यायाम करून शुगरवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.)

  • योग्य घरगुती उपाय करणं (होम रेमेडीज) (उदाहरणार्थ, आयुर्वेदिक काढा)

  • आजाराबद्दल सखोल माहिती घेऊन लक्षणं आणि पॅरामीटर्सवर सतत लक्ष ठेवणं. (मॉनिटरिंग) (उदाहरणार्थ, शुगर लेव्हल, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल)

  • आजार वाढू नये म्हणून आजाराप्रमाणे आहारात, व्यायामात व इतर जीवनशैलीतील बदल (lifestyle changes). (उदाहरणार्थ, शुगर जास्त असल्यास गोड खाणं बंद करणं, दालचिनीचं सेवन करणं, व्यायाम वाढवणं इत्यादी.)

  • फक्त एकच औषधोपचार पद्धती न वापरता दुसऱ्या पद्धतींमध्येसुद्धा उपाय शोधणं (आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार) (अल्टर्नेटिव्ह मेडिसिन)

औषधोपचाराची प्रत्येक पॅथी वेगळी आहे. त्यांचे मूळ सिद्धांत, औषधोपचाराची पद्धत, वेगळे आहेत. प्रत्येक पॅथीचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स असतात. काही विशिष्ट आजारांमध्ये काही पॅथी खूप परिणामकारक ठरते. (उदाहरणार्थ, ऑटो इम्युन आजारांमध्ये होमिओपॅथी खूप चांगले रिझल्ट्स देते. किडनीच्या आजारांवर आयुर्वेद खूप प्रभावशाली आहे इत्यादी.)

या सर्व माहितीमधून आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, की जुनाट आजारांशी दोन हात करणं हा काही साधा उपक्रम नव्हे. जसं शत्रूशी लढताना सर्व शस्त्रं, रणनीती, सेना, आर्थिक संसाधनं यांच्यासह सज्ज असावं लागतं, तसंच या जुनाट आजार नव्या बलाढ्य शत्रूशी लढतानादेखील अनेक नियम, जागरूकता, निरनिराळ्या पॅथी आणि वर नमूद केलेले मुद्दे हे सर्व हाताशी घेऊन विजय मिळवावा लागतो, हे नक्की.

अवघड वाटत असलं, तरी खरं तर हे खूप सोपं आहे, कारण निसर्ग नावाचा मित्र सदैव आरोग्याच्या दिशेनं आपल्याला सतत मार्गस्थ करत असतो.

(टीप : डिसीज रिव्हर्सलचं यश अनेक पॅरामीटर्सवर अवलंबून आहे आणि काही केसेसमध्ये औषधोपचार घेत राहावा लागतो. या लिखाणाचा हेतू औषधोपचारांना विरोध करणं नसून आपल्यापर्यंत डिसीज रिव्हर्सल, नॅचरल हीलिंग, होलिस्टिक हीलिंग इत्यादी विषयांवर माहिती पोचवून नव्या पद्धतीच्या ट्रीटमेंटचा फायदा करून देणं आहे. हे लेख कोणत्याही रुग्णाचे औषधं थांबवण्याचा सल्ला देत नाहीत. औषध कमी व अधिक करण्याबाबतीतील सल्ला तज्ज्ञ वैद्यांकडून घ्यावा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com