Health Care News : वजन कमी करण्यासाठी रोज प्या जिऱ्याचे पाणी; पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल!

तुम्ही तुमच्या आहारात जिऱ्याचा समावेश करू शकता. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे पचनक्रिया तर सुधारतेच पण वजनही कमी होते.
cumin water
cumin watersakal

आपल्या सर्वांना माहित आहे की वजन वाढणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. यामुळे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही तुमच्या आहारात जिऱ्याचा समावेश करू शकता. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे पचनक्रिया तर सुधारतेच पण वजनही कमी होते. आयुर्वेदातही हे फायदेशीर मानले जाते. यामुळे पोटाची चरबीही कमी होते.

वजन कमी करण्यासाठी या प्रकारे जिऱ्याचे सेवन करा

जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. एक चमचा जिरं आणि 4-5 तुळशीची पाने पाण्यात उकळून प्या.

जिऱ्यामध्ये थायमॉल असते. हे वजन कमी करते आणि चयापचय वाढवते.

त्यात फायबरही मुबलक प्रमाणात असते. यामुळे पोट सहज साफ होते.

तुळशीची पाने देखील लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिरं आणि लिंबू पाणी पिऊ शकता.

1 चमचा जिरं 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळून प्या.

लिंबू शरीरातील डिटॉक्सिफाईंग आणि वजन कमी करण्यासही मदत करते.

हे पेय तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी प्यावे लागेल.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचा चहा देखील पिऊ शकता.

एक चमचा जिरं पाण्यात टाकून उकळा.

आता ते गाळून घ्या आणि थंड होऊ द्या.

नंतर त्यात मध घालून प्या.

त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होईल.

cumin water
Health Care News : चिया सीड्समध्ये दडलाय आरोग्याचा खजिना; या प्रकारे आपल्या आहारात करा समावेश

आलं-जिरा पाणी

आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या आणि रात्रभर एक ग्लास पाण्यात जिऱ्यासोबत भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या, वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

दही आणि जिरा पाणी

प्रथम एक ग्लास दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा जिरे पावडर घाला. पावडर चांगली मिसळल्यानंतर रिकाम्या पोटी हे दही प्या.

गूळ आणि जिरे पाणी

पाणी गरम करून त्यात थोडा गूळ घाला. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर त्यात जिरे टाका आणि चहासारखे चांगले गरम करुन उकळून घ्या. गुळ आणि जिरे पाणी हा वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Shabda kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com