
Beet Juice : कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? दररोज प्या बीटचा ज्युस, जाणून घ्या आणखी फायदे...
Beet Juice : बीट हे आपल्या आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे. बीटला काही लोक सलाद म्हणूनही खातात तर काही लोकांना बीटचा जूस पिणेही आवडते. बीटचं सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बीट समाविष्ट करत असाल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना ज्युस पिणे खूप आवडते. अशात बीटचा ज्युस आपल्यासाठी वरदान ठरू शकते. आज आपण बीटचा ज्युस पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत, त्याविषयी जाणून घेणार आहोत. (drinking Beet Juice helps to control cholesterol)
बीटचा ज्युस पिल्याने ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते. प्रत्येक दिवशी जवळपास 250 ml बीटचा ज्युस ब्लड प्रेशरला कंट्रोल करू शकतो आणि आपल्या ब्लड वेसल्सला रिलॅक्स करू शकतो. यामुळे तुमची हार्ट हेल्थ इंप्रूव होते.
बीटच्या ज्युसमध्ये असलेले नाइट्रेट्स वयस्कर लोकांच्या ब्रेन मध्ये ब्लड सप्लाय चांगल्या प्रकारे करतात. ज्यामुळे डिमेंशियाच्या कंडीशनला स्लो केले जाऊ शकतात. वयस्कर लोकांच्या मेमोरीसाठी हे ज्युस वरदान ठरू शकतं.
जास्त वजन असणाऱ्या लोकांना बीटचा जूस खूप फायदेशीर असतो. यामध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते आणि फॅट तर अजिबात राहत नाही. यामुळे वजन कंट्रोल केले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या ज्युसची सुरवात बीटच्या ज्युसनी करू शकता.
बीट का ज्युस टोटल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडच्या स्तरला कमी करण्यास मदत करते. शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलला वाढविते आणि लिवरच्या ऑक्सीडेटिव स्ट्रेसला कमी करते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रासलेल्या लोकांनी दररोज बीटचा ज्युस पिणे फायदेशीर आहे.