Paper Cup Health Risk: कागदी कपातील चहा ठरत आहे घातक; बीपीए कोटिंगमुळे आरोग्याला धोका

Experts Warn About Health Risks of Drinking any Beverages from Paper Cups: कागदी कपामधील बीपीए कोटिंगमुळे चहा पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
Experts Warn About Health Risks of Drinking any Beverages from Paper Cups
Experts Warn About Health Risks of Drinking any Beverages from Paper Cupssakal
Updated on

थोडक्यात:

  1. प्लास्टिक कपांवर बंदीनंतर चहा टपऱ्यांवर कागदी कपांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  2. कागदी कप टिकवण्यासाठी त्यावर एका रसायनाचे कोटिंग केले जाते, जे गरम चहात मिसळते.

  3. या विषारी कोटिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Health Risks of Drinking in Disposable Cups: शहरातील हजारो चहा टपऱ्यांवर कागदी कपांमध्ये चहा दिला जातो. प्लास्टिक कपांवर बंदी आणल्यानंतर कागदी कपांमध्ये चहा देण्याचा पर्याय शोधण्यात आला. परंतु, हा पर्यायही धोकादायक असल्याचे पुढे आले आहे. कागदी कप जास्त दिवस टिकून राहावे, यासाठी बीपीए नावाच्या केमिकलचे कोटिंग केले जाते. हाही प्लास्टिक कोटिंगचाच प्रकार असून, गरम चहामधून जीवघेणे रसायन नागरिकांच्या शरीरात जात आहे. त्यामुळे, शहरातील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हे कागदी कप दीर्घ काळ टिकविण्यासाठी बीपीए या केमिकलचा कोट चढवला जातो. राष्ट्रीय पर्यावरण आरोग्य विज्ञान संस्थेनुसार, बीपीए हे मुख्यत: पॉली कार्बोनेट प्लास्टिक आणि इपॉक्सी रेजिन्सच्या उत्पादनात वापरले जाते. या कपामध्ये गरम चहा दिला जात असल्याने प्लास्टिक पोटात जाण्याची शक्यता असून, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. काय आहे बीपीए

कागदी कप मजबूत करण्यासाठी आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी बीपीएचे कोटिंग केले जाते. परंतु हे कोटिंग बिस्फेनॉल ए (बीपीए), फॅथलेट्स आणि पेट्रोलियम-आधारित अनेक हानिकारक रसायनांनी बनले असते.

बुलढाणा पॅटर्नची गरज

मागल्या वर्षी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कपांवर जिल्ह्यात बंदी घातली. बुलढाणा शहरातील पर्यावरणवाद्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. चहाचा कागदी कप तयार करताना त्यात बीपीएचे कोटिंग असते. त्यामुळे, पर्यावरणवाद्यांनी बंदीची मागणी केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या कपावर बंदीचे निर्देश दिले. नागपुरातही या कपांवर बंदीची मागणी केली जात आहे.

कागदी कपात मॅक्रो प्लॉस्टिक जास्त प्रमाणात असतात. ते आपल्या पोटात गेले तर कर्गरोगासारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. चहाच्या दुकानात कागदी कपांवर बंदी घालणे आवश्यक आहे.

- डॉ.अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

FAQs

  1. कागदी कप आरोग्यासाठी घातक का आहेत? (Why are paper cups harmful to health?)
    कागदी कपांमध्ये टिकावासाठी बीपीए (बिस्फेनॉल ए) नावाच्या रसायनाचे कोटिंग केले जाते. गरम चहा या कपात दिल्यास हे रसायन चहामध्ये मिसळून शरीरात जाऊ शकते. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

  2. बीपीए म्हणजे नेमकं काय आहे? (What exactly is BPA?)
    बीपीए म्हणजे बिस्फेनॉल ए. हे एक केमिकल असून ते पॉलीकार्बोनेट प्लास्टिक आणि इपॉक्सी रेजिन्स तयार करताना वापरले जाते. आरोग्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

  3. कागदी कपांऐवजी कोणता पर्याय सुरक्षित आहे? (What is a safer alternative to paper cups?)
    काचेचे ग्लास, स्टीलचे कप किंवा पुनर्वापर करता येणारे इको-फ्रेंडली कप हे कागदी कपांपेक्षा अधिक सुरक्षित पर्याय आहेत.

  4. बीपीएयुक्त कागदी कपांवर कुठे बंदी घालण्यात आली आहे? (Where have BPA-coated paper cups been banned?)
    बुलढाणा जिल्ह्यात बीपीएयुक्त कागदी कपांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com