
दोन बिअर पिण्यामुळे मेंदू 10 वर्षांनी म्हातारा होतो; संशोधकांचा दावा
सर्वांनाच माहित आहे की, मद्यपान हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे विशेषत: मेंदूच्या आरोग्यासाठी. पण, आपण योग्य प्रमाणात मद्य सेवन केले जाऊ शकते असे आपण गृहित धरतो. परंतु एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून दोन बिअर प्यायल्यामुळे तुमचा मेंदू १० वर्ष म्हातारा होऊ शकतो म्हणजेच, 10 वर्षांच्या वृद्धत्वामुळे मेंदूचे जितके नुकसान तितके फक्त रोज २ बिअर प्यायल्यामुळे होते. (Drinking Two Beers A Day Damages Brain As Much As Ten Years Of Aging)
संशोधकांनी या अभ्यासात अल्कोहोलचे सेवन आणि मेंदूतील राखाडी आणि पांढर्या पदार्थांचे प्रमाण पाहिले, जेणेकरुन मध्यम प्रमाणात बिअर घेतल्याने वर्षानुवर्षे नुकसान कसे होऊ शकते हे चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.
हेही वाचा: कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका: युद्धामुळे महागणार गाड्या
या अभ्यासादरम्यान, यूकेच्या बायोबँकमधील 36,000 हून अधिक व्यक्तींच्या उच्च-गुणवत्तेच्या एमआरआय स्कॅनचे विश्लेषण केले. त्यांनी जास्त मद्यपान करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलेल्या अभ्यासाचा देखील पाठपुरावा केला. संशोधकांना असे आढळून आले आहे की, मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूतील पांढरे आणि राखाडी पदार्थांचे प्रमाण कमी होऊ शकते.
आश्चर्यकारक बाब म्हणजे डेटामधून जास्त मद्यपान करणाऱ्यांना काढून टाकल्यानंतरही परिणाम फारसे वेगळे नव्हते. तुम्ही किती प्रमाणात मद्यपान करत आहात आहात याने काही फरक पडत नाही कारण जे नुकसान हे होतेच. अभ्यासाने सरासरी मद्यपान दर्शविते, पण, वारंवारता आणि भिन्न प्रमाण आणि मेंदूच्या आरोग्यावर त्यांचा प्रभाव होऊ शकतो याकडे संशोधक लक्ष देतात.
हेही वाचा: 12 वर्षाचा मुलगा आहे क्रिप्टोकरन्सी एक्सपर्ट, असा झाला कोटींचा मालक!
अभ्यासाच्या लेखकांपैकी एक, गिडॉन नेव्ह यांनी स्पष्ट केले, की "या अभ्यासात सरासरी वापरावर लक्ष दिले गेले आहे, परंतु दिवसातून एकदा बिअर पिणे हे आठवड्यातून एकही न पिण्यापेक्षा आणि नंतर आठवड्याच्या शेवटी सात वेळा पिणे चांगले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.''
Web Title: Drinking Two Beers A Day Damages Brain As Much As Ten Years Of Aging
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..