Jym Care Tips: याच कारणाने या अभिनेत्यांना आला होता हार्ट अटॅक; जिम करताना काही गोष्टी टाळा अन्यथा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jym Care Tips

Jym Care Tips: याच कारणाने या अभिनेत्यांना आला होता हार्ट अटॅक; जिम करताना काही गोष्टी टाळा अन्यथा...

Health Care: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं वयाच्या ४६ व्या वर्षी जिममध्ये हृदयविकाराने निधन झालं. त्याच्या अचानक जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त होत आहे. याआधीही राजू श्रीवास्तव, सिद्धार्थ शुक्ला, केके या बड्या अभिनेत्यांच्या मृत्यूमागचं प्रमुख कारण हे हृदयविकारच होतं. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तेव्हा तुमच्यासोबत ही दूर्घटना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.

हृदयविकाराचा झटका का येतो?

मधुमेह किंवा ब्लड प्रेशर असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे जिम लावण्यापूर्वी हृदयाची तपासणी करणं आवश्यक आहे. (Health)

हृदयाच्या धमन्यांमध्ये एरिथेमॅटस प्लेक जास्त व्यायाम (Gym Exercise) केल्यानं फुटण्याचा धोका असतो त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. इतरांच्या सांगण्यावरून क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं धोकादायक ठरू शकतं. स्वत:च्या क्षमतेबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Women Health : वयाची तिशी ओलांडल्यानंतर महिलांना का सुरू होते पोटऱ्यांचे दुखणे ?

तणाव आणि अवेळी झोपण्याने देखील हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. आम्ली पदार्थांचं सेवन करणं, कॅफिन घेणं किंवा जंक फूड या कारणानेदेखील हृदयविकार उद्भवतो.

जिममध्ये जाण्याआधी कोणती काळजी घ्यावी?

तुम्ही जिम लावण्याआधी तुमच्या हृदयाची चाचणी करून घ्यावी.

योग्य आहार घ्यावा

क्षमतेपक्षा जास्त वजन उचलण्याचा जिममध्ये अट्टाहास नसावा.

जंक फुड टाळावे.