Early Breast Cancer Care: अर्ली ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करायचा? तज्ज्ञांनी सांगितले ५ प्रभावी उपाय

Breast Cancer Care Guide: अर्ली ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेले ५ महत्त्वाचे उपाय आणि योग्य उपचारांबद्दल जाणून घ्या.
Early Breast Cancer Care

Early Breast Cancer Care

sakal

Updated on

How to Lower Early Breast Cancer Recurrence Risk: अर्ली ब्रेस्ट कॅन्सरचे (सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग) निदान अनेकदा अनिश्चिततेची लाट घेऊन येते. उपचारांच्या चिंतेपलीकडे अनेक महिलांना पुढे काय होणार याची काळजी लागलेली असते: कॅन्सर पुन्हा होईल का? आयुष्य कधी पुन्हा सामान्य होईल का? उपचारांचा माझ्या कामावर, कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर आणि भविष्यातील योजनांवर काय परिणाम होईल?

कॅन्सर पुन्हा होण्‍याची चिंता पूर्णपणे रास्त असली आणि कधी-कधी हा धोका ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असू शकत असला तरी ब्रेस्ट कॅन्सर उपचारांमधील प्रगतीने अर्ली ब्रेस्ट कॅन्सरच्या व्यवस्थापनात मोठे बदल घडवून आणले आहेत. आज, उपचार हे वाढत्या प्रमाणात वैयक्तिकृत केले जातात, ज्यामुळे महिलांना कॅन्सर पुन्हा होण्‍याचा धोका कमी करता येतो आणि त्याच वेळी त्या आपले करिअर पुढे नेणे, प्रियजनांची काळजी घेणे आणि जीवनातील महत्त्वाचे टप्पे साध्य करणे सहजपणे सुरू ठेवू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com