कोल्हापूर : अचानकपणे छातीत कळ आली. ‘त्याला’ रुग्णालयात नेलं. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे निदान झाले. विनाछेद हृदय शस्त्रक्रिया करावी लागली. अशा घटना दर आठवड्याला ऐकायला मिळत आहेत. यात अवघ्या चाळिशीतील व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येत आहे. एकूण शंभरात ३५ व्यक्तींना कमी वयात उच्च रक्तदाबांची लक्षणे दिसत आहेत. त्यासोबत हृदयविकार जडला आहे वाढत्या उच्च रक्तदाबाकडे (High Blood Pressure) होणाऱ्या दुर्लक्षाचा फटका आरोग्याला बसत असल्याने उच्च रक्तदाब समजून घेऊन तो नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.