Seasonal Allergiesमुळे होणाऱ्या अस्थमाचा उपचार झाला सोपा: संशोधकांचा दावा | Health News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seasonal Allergiesमुळे होणाऱ्या अस्थमाचा उपचार झाला सोपा: संशोधकांचा दावा

Seasonal Allergiesमुळे होणाऱ्या अस्थमाचा उपचार झाला सोपा: संशोधकांचा दावा

Seasonal allergies treatment: जसजसा ऋतू बदलतो, तसतसे अ‍ॅलर्जी किंवा दम्याचे त्रास वाढतात. सहसा लोकांना हे कळत नाही की, या काळामध्ये त्रास का वाढतो, त्यामुळे उपचार करण्यामध्ये अडथळा येतो. दरम्यान, इंडियाना यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या (Indiana University School of Medicine)

डिपार्टमेंट ऑफ माइक्रोबायोलॉजी एंड इम्यूनोलॉजी (Department of Microbiology and Immunology) येथील संशोधकांनी, seasonal asthmaवर उपचार करण्यासाठी नवीन संशोधन केले आहे.

जेव्हा कोणाला ऋतूमध्ये बदल झाल्यामुळे किंवा वारंवार होणाऱ्या अस्थमामुळे ऍलर्जी असूनही श्वास घ्यावा लागतो तेव्हा त्यांना शिंकण्याचा आणि खोकण्याचा त्रास सुरू होतो.

(Easy to treat asthma caused by seasonal allergies Researchers claim)

हेही वाचा: Artificial Intelligence Tool ओळखणार हार्ट अ‍ॅटकचा धोका : संशोधकांचा दावा

एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये निर्माण होणारे परागकन (pollen grains), शैवाळ (algae) या अॅलर्जीच्या (allergies) इतर घटकांच्या संपर्कात येण्यामुळे अॅन्टीजन सेल सिडी4 (CD4) पॉझिटिव्ह टी-सेल अॅक्टिव्ह करते. ज्यामुळे सायटोकाईनचा (cytokine)स्राव म्हणजेच डिस्चार्ज होऊ शकतो आणि सूज किंवा आग होऊ शकते.

संशोधकांच्या टीमने सांगितले की, इंटरल्यूकिन 9 (Interleukin 9) नावाचा सायटोकाइन, ज्याला IL-9 म्हणतात,अॅलर्जीक स्मरणशक्तीवर (Allergic memory)कशी प्रतिक्रिया करते याकडे लक्ष दिले. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल सायन्स इम्युनोलॉजीमध्ये (Science Immunology)’प्रकाशित झाले आहेत.

संशोधकांना मेमरी CD4T साठी एक नवीन रूप सापडले आहे, जे IL-9 ला IL-5 आणि IL-13 सह एकत्रित करते. (पेशी) मध्ये अॅन्टीजन IL-9 स्राव होतो. यासोबतच या पेशींनी ST-2 स्वरुपामध्ये देखील दिसतो, जो IL-33 रिसेप्टर असतो. IL-33 रिसेप्टरच्या अस्तित्वासह असते, IL-9 अधिक प्रमाणात विशिष्ट अॅलर्जी घटकाच्या स्वरूपात असतो

यानंतर, IL-9 अवरोधित केल्याने श्लेष्माच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या अनेक जनुकांचे कार्य कमी होते. इतकेच नाही तर CD-4T सेल आणि B सेल देखील कमी होतात आणि मायक्रोफेजेसचे सक्रियकरण बदलते.

हेही वाचा: TB Patient: लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण

तज्ज्ञ काय सांगतात

अभ्यासाचे मुख्य लेखक बेंजामिन जे. उलरिच(Benjamin J. Ulrich) सांगतात की, दम्याच्या उपचारांमध्ये त्याची लक्षणे कमी करणे हे प्राधान्य आहे. अनेक रुग्णांना वारंवार उपचार करावे लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणून आम्ही प्रयोगशाळेत एक मॉडेल विकसित केले जे अॅलर्जीक स्मृती अधिक अचूकपणे परिभाषित करेल आणि फुफ्फुसांच्या प्रतिसादाची आठवेल.

अभ्यासात काय निष्पन्न झाले

संशोधकांचे मतानुसार या अभ्यासातून असे सूचित होते की, फुफ्फुसातील IL-9 ला लक्ष्य करणे आणि स्मृती पेशींवर(Allergic cells) लक्ष केंद्रित करणे हा Seasonal allergiesसाठी एक नवीन उपचार असू शकतो.

टॅग्स :asthama