भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येणारे श्री गणेशाचे व्रत हे पार्थिव गणेशाचे व्रत. माघ शुद्ध चतुर्थी हा गणपती देवतेचा जन्मदिवस परंतु भाद्रपदात मृत्तिकेचा गणपती बनवून त्यावर अ-थर्व-शीर्ष म्हणजे कंप न पावणारे, न थरथरणारे, चित्तवृत्ती शांत असणारे मस्तक स्थापन करून त्यात प्राणप्रतिष्ठा करण्याचा दिवस.
प्रत्येक मनुष्य हा पार्थिव पंचतत्त्वांतून तयार झालेले शरीर घेऊन येतो. पार्वतीने सुद्धा स्व-मळातून या बालकाची निर्मिती केली. स्त्रीच्या शरीरात गर्भाशयात अशाच तऱ्हेने अपत्याची निर्मिती पंचमहाभूतांपासून होत असते.