Physiotherapy
sakal
- डॉ. अपूर्व शिंपी, संचालक, सिंबायोसिस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे
सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण धावतच असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार साठ टक्के मृत्यू हे जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे होतात. भारतात प्रत्येक तिसऱ्या प्रौढाला उच्च रक्तदाब आहे. लठ्ठपणा, मधुमेह, ताणतणाव – हे आता सामान्य झाले आहेत.
मधुमेह : चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव.
उच्च रक्तदाब : ताणतणाव, अस्वास्थ्यकर जीवनशैली.
स्थूलता : सतत बसून राहणं, जंक फूड.
कंबरदुखी व पाठदुखी : संगणक व मोबाईलमुळे चुकीची बसण्याची पद्धत.
संधिवात : व्यायामाचा अभाव, वयोमानानुसार सांध्यांवरील ताण.
मानसिक ताण, नैराश्य : धकाधकीचं जीवन, विश्रांतीचा अभाव.