Egg Side Effects: दिवसभरात यापेक्षा जास्त अंडी खाऊ नका,नाही तर होऊ शकते तुमच्या शरीराचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Egg Side Effects

Egg Side Effects: दिवसभरात यापेक्षा जास्त अंडी खाऊ नका,नाही तर होऊ शकते तुमच्या शरीराचे नुकसान

अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्यामुळेच 'संडे असो की मंडे रोज खा अंडे' असे बोलले जाते. दरम्यान काही लोकांचा असा समज आहे की जास्त अंडी खाल्ल्याने नसांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे अंड्याना सुपरफूड देखील म्हटले आहे. मात्र अंड्यांचे जास्त प्रमाणात केलेले सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

एका दिवसात किती अंडी खावावीत?

आरोग्य तज्ञांच्या मते एका दिवशी एक अंडे खाणे पुरेसे आहे, जर तुम्ही नियमित अंडी जास्त प्रमाणात खात असाल तर त्याचा प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. अंडी खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉलवर फारसा परिणाम होत नसला तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नाही. अंड्याची चव गरम असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने इतर काही समस्या उद्भवू शकतात.

आता बघू या अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागु शकते याविषयीची सविस्तर माहिती..

● डायरिया

प्रमाणापेक्षा जास्त कोणती गोष्ट खाणे हे मानवी शरिराला घातकच ठरू शकते. तोच नियम अंडे खातांना सुध्दा लागू होतो.तुम्ही जर का रोज दोन किंवा त्यापेक्षा अंडी खात असाल तर तुम्हाला डायरिया होण्याची शक्यता असते.

● हृदयविकाराचा झटका

अंड्याच्या अतिसेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.

● कोलेस्टेरॉल

अंडी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मात्र त्यांचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात दरम्यान, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने पोटात सूज येऊ शकते. त्यामुळे एका दिवसात 2 पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. दिवसभरात 2 पेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

● त्वचेवर ॲलर्जी

नियमितपणे जास्त अंडी खाल्ल्याने त्वचेवर फोड्या येऊ शकतात, तर काही लोकांना संपूर्ण त्वचेवर फोड्यांची ॲलर्जी होऊ शकते. जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे डायबिचीजची समस्या वाढण्याची शक्यता आहे. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.

Web Title: Egg Side Effects Dont Eat More Than This Egg In A Day Otherwise It May Damage Your

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..