

Egg Yolk Misconceptions and Cholesterol
Sakal
डॉ. मृदुल देशपांडे
अनेक लोक ‘अंड्यांच्या पिवळ्या बलकात कोलेस्ट्रॉल असतं, म्हणून ते आरोग्यासाठी वाईट’ हा गैरसमज सत्य मानतात. आधुनिक विज्ञान आणि फंक्शनल मेडिसिनच्या एकमताने समोर आलेलं चित्र वेगळंच आहे. अंड्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही, उलट ते संपूर्ण मेटाबॉलिक स्वास्थ्य सुधारतं.
कोलेस्ट्रॉल म्हणजे शत्रू नाही
कोलेस्ट्रॉल हा महत्त्वाचा घटक आहे. हॉर्मोन्स, व्हिटॅमिन डी, सेल मेंब्रेन, यांच्या निर्मितीसाठी त्याची गरज असते. आपल्या शरीरातील ७०-८० टक्के कोलेस्ट्रॉल लिव्हरच तयार करत असतो. आपण अंड्यातून घेतलेलं कोलेस्ट्रॉल आणि शरीरातील चरबी, याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे, ‘अंड्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं’ ही भीती केवळ कालबाह्य आहे.