
एकपाद पादांगुष्ठासन
एकपाद पादांगुष्ठासन
हे तोलात्मक चवड्यावर करण्याचे आसन आहे
ekpad padungasthasana yoga steps benefits
हे तोलात्मक चवड्यावर करण्याचे आसन आहे. प्रथम पादांगुष्ठासनाचा सराव करावा नंतरच एकपाद पादांगुष्ठासन करावे.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे राहावे. दोन्ही हात समोर घेऊन हळूहळू गुडघे वाकवून चवड्यावर बसावे, म्हणजेच पादांगुष्ठासन करावे.
यामध्ये तोल सांभाळला गेल्यावर सावकाश एक पाय हाताच्या आधाराने वर उचलून मांडीवर ठेवावा. म्हणजेच अर्धपद्मासन करताना ठेवतात, त्याप्रमाणे पाय ठेवावा.
छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे एका चवड्यावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळावा. दोन्ही हातांचा नमस्कार करावा. श्वास संथ सुरू ठेवावा. नजर स्थिर असावी.
आसनाचे फायदे
या आसनाच्या नियमित सरावाने एकाग्रता वाढते. मन शांत होते. पायांची ताकद वाढते.
डोक्यात सतत सुरू असणाऱ्या विचारांचा गोंधळ कमी होतो.
मुलांची चंचलवृत्ती कमी होण्यास मदत होते. चिडचिड कमी होते. आत्मविश्वास वाढतो.
आसन करताना सुरूवातीला तोल जाण्याची शक्यता असते, म्हणून अगदी सावकाश सराव करावा.