
Excess Blood Stock After Festive Donation Camps to Be Supplied to Needy Districts
sakal
Blood Donation: स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र या वेळी गरजेपेक्षा अधिक रक्तसंकलन होऊन त्यातील काही प्रमाणात मुदतबाह्य होत असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) विशेष पाऊल उचलले आहे. राज्यात प्रथमच एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त रक्त असलेल्या जिल्ह्यांमधून कमतरता असलेल्या जिल्ह्यांपर्यंत रक्ताचे नियोजनबद्ध स्थलांतर होणार आहे.