
पुणे : शरीर पिळदार करण्यासाठी तसेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तरुण अतिव्यायाम करतात. प्रमाणाबाहेर वजनही उचलतात. निरोगी शरीरासाठी व्यायाम करायलाच हवा. परंतु, तो सुरुवातीच्या टप्प्यातच अतिप्रमाणात किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय केला तर त्यामुळे ‘हर्निया’ होण्याचा धोका वाढत आहे.