

Anemia in Children on the Rise Due to High Milk Intake, Experts Say
sakal
अॅनिमिया म्हणजे रक्तातील लोहतत्त्वाचे प्रमाण कमी होणे आहे. मुले हे देशाचे भविष्य आहे, मात्र यानंतरही ६७ टक्के मुलांमध्ये अॅनिमिया आढळून येत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब कल्याण विभागाच्या ताज्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. विशेष असे की, दुधाच्या अति सेवनामुळेदेखील अॅनिमिया हा आजार वाढत असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञांनी उपराजधानीत आयोजित परिषदेत दिली आहे.
अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या नागपूर शाखेच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती इंडियन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. एम. सिंगारावेलू, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर उपस्थित होते.