
Heart Health Tips for Young Adults
sakal
Youth Fitness: पूर्वी मुख्यत्वे साठीनंतर येणारा हृदयविकार आता २५ वर्षांच्या तरुणांमध्ये शिरकाव करत आहे. अगदी वीस ते पंचविशीतील तरुणांवरही हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या खुल्या करणारी 'अँजिओप्लास्टी' ही प्रक्रिया करण्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे.
हृदयविकाराच्या या बदलत्या प्रवृत्तीमागे जीवनशैलीतील बदल कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हृदयरोग आता केवळ वृद्धापकाळातील आजार राहिलेला नाही, तर तो तरुण पिढ्यांमध्येही वाढत आहे.