
Dangerous Effects of Antibiotic Overuse Discussed by Doctors
sakal
Medical Experts Raise Concerns Over Reckless Antibiotic Usage: प्रतिजैविक औषधांच्या अंदाधुंद वापरामुळे कोणत्याही संसर्गांवरील औषधांचा परिणाम कमी होत आहे. म्हणजेच ही औषधे रोग-प्रतिरोधक बनत आहेत, जो वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठा धोका बनत आहे. आता डेंगी, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या संसर्गांवर उपचार करणेदेखील कठीण होत असल्याची परिस्थिती आहे. या धोक्याला तोंड देण्यासाठी क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीज सोसायटीच्या (सीआयडीएस) शनिवारी (ता. १३) एनसीपीए येथे झालेल्या वार्षिक परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली.